जायचे कसे

भोगोलिक माहिती

ओंकार पठार (किल्ले सामानगड) हे ठिकाण कोल्हापूर जिल्हातील गडहिंग्लज तालुक्यातील मौजे चिंचेवाडी गावाचे सीमेमध्ये असून चिंचेवाडी ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये मोडते.

याठिकाणाची अंतरे खालील प्रमाणे आहेत.
अ) कोल्हापूर ते गडहिंग्लज अंतर ७० कि.मी. आहे. तेथून गडहिंग्लज ते सामानगड अंतर ११ कि.मी आहे.
क) पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गापासून
१) महामार्गावरील कर्नाटकातील संकेश्वर या गावापासून गडहिंग्लज १९ कि.मी. अतंर तेथून गडहिंग्लज ते सामानगड ११ कि.मी – एकूण अंतर ३० कि.मी
२) महामार्गावरील कर्नाटकातील खानापूर फाटा ते हलकर्णी – नौकुड -सामानगड अंतर १९ कि.मी. आहे

सामानगडकडे जाण्याचे मार्ग

१) कोल्हापूर निपाणी – तवंदी घाट माथा – तवंदी शिप्पूर , हडलगे तीटा, कालभैरी मार्गे गडहिंग्लज – भडगाव – चणेकुप्पी फाटा – समर्थ नगर – सामानगड – एकूण अंतर ८१ कि.मी.
२) कोल्हापूर निपाणी – संकेश्वर (महामार्ग) – गडहिंग्लज – भडगाव – चणेकुप्पी फाटा – समर्थ नगर – सामानगड – एकूण अंतर ९० कि.मी.