सामानगड परिसर (ओम स्वरूप भीमसासगिरी डोंगर – ओम पठार ) हा सुमारे २० कि.मी. परिघाचा प्रशस्त पठारी भाग असून हा सृष्टी निर्मित अप्र्रतिम ओम आकाराचा आहे. या संपूर्ण परिसरास भीमसासगिरी नावाने ओळखले जाते. पठारावरील हत्ती दगड या ठिकाणाजवळील एका विशिष्ट ठिकाणाहून पहिले असता सुमारे १०० रुंदीचा व १० कि.मी. लांबीचा संपूर्ण डोंगराचा पठारी भाग अप्रतिम ओम आकाराचा असल्याचे दृष्टिपथात पडते. हे जाणून प्राचीन काळी या भागात विशिष्ट खुणा (डिमार्केशन) केल्याचे आढळून येते.

हे स्थळ ओमस्वरूप असल्याचा शोध श्री के. टी. शेलार यांना २ नोव्हेंबर १९९८ रोजी दुपारी १२:०० वाजता लागला . 

निसर्गाचा अदभूत अविष्कार या ठिकाणी पाहावयास मिळतो.